॥ श्री देवीची आरती ॥
दुर्गे दुर्गटभारी, तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे, करुणा विस्तारी ॥
वारी वारी, जन्म मरणांतें वारी । हारी पडलो आता, संकट निवारी ॥१॥
जय देवी जय देवी, जय महिषासुरमथिनी । सुरवर ईश्वर वरदे, तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥
त्रिभुवनी भुवनी पाहता, तुज ऐसे नाही । चारी श्रमले परंतु, न बोलवे काही ॥
साही विवाद करता ,पडले प्रवाही । ते तू भक्तांलागी,ते तु दासालागी, पावसि लवलाही ॥२॥
प्रसन्नवदने, प्रसन्न होशी निजदासा । क्लेशापासुन सोडी, तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवाचून, कोण पुरवील आशा । नरहरि तल्लिन झाला, पदपंकजलेशा ॥३॥
Leave a Reply
You must be logged in to post a comment.