Shankarachi Aarti (शंकराची आरती)

।। श्री शंकराची आरती ।।

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा, आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।
जय देव जय देव ॥धृ॥

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभुतीचे उधळण शितकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥

देवी दैत्यी सागरमंथन पै केले, त्यामाजी अवचित हळहळ जे उठले ।
ते त्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥३॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी, रघुकुलटिळक रामदासा अंतरी॥४॥

Leave a Reply